लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील कृषीपंपधारक शेतक-यांकडे सन २०१४ पासून विजेची थकबाकी असून ती आजमितीस तब्बल ३१९ कोटी रुपयांवर पोहचली आहे. यामुळे महावितरण सर्वार्थाने हतबल झाले आहे. दरम्यान, शेतक-यांना थकबाकी अदा करणे अवघड जाऊ नये, यासाठी महावितरणने अंमलात आणलेल्या ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी’ या योजनेलाही विशेष प्रतिसाद मिळाला नाही. या योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील केवळ १०७५ शेतकºयांनीच सहभाग नोंदविला असून २५.८० लाख रुपये वसूली झाल्याची माहिती येथील अधीक्षक अभियंता व्ही.बी.बेथारिया यांनी मंगळवारी दिली. वाशिम जिल्ह्यात सुमारे २६ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनासाठी वीज पुरविली जाते. त्यात ५२ हजार ५०० शेतकºयांना कृषीपंपाची वीजजोडणी देण्यात आली आहे. विजेच्या सुविधांमुळे शेतकºयांना रब्बी हंगामात गहू, हरभरा, सूर्यफुल, तीळ, करडई आदी पिकांसह भाजीपाल्याची लागवड करणे शक्य होत आहे. काही शेतकरी नियमित न चुकता विजेचे देयक अदा करतात. मात्र, बहुतांश शेतकरी विविध कारणांमुळे नियमित वीज देयक अदा करू शकत नाहीत. अशा शेतकºयांकडे असलेली थकबाकी सद्या ३१९ कोटी रुपयांवर पोहचली आहे. ही रक्कम वसूल करताना महावितरणच्या नाकी नऊ येत आहे. दरम्यान, कृषीपंप थकबाकी वसूलीची प्रक्रिया सोपी व्हावी तद्वतच थकबाकीदार शेतकºयांनाही सोयीचे व्हावे, यासाठी शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेची आखणी केली. मात्र, त्यास थकबाकीदारांमधून विशेष प्रतिसाद लाभलेला नाही.
वाशिम जिल्ह्यात कृषीपंपाची थकबाकी ३१९ कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 8:40 PM
वाशिम : जिल्ह्यातील कृषीपंपधारक शेतक-यांकडे सन २०१४ पासून विजेची थकबाकी असून ती आजमितीस तब्बल ३१९ कोटी रुपयांवर पोहचली आहे. यामुळे महावितरण सर्वार्थाने हतबल झाले आहे.
ठळक मुद्देमहावितरण हतबल‘कृषी संजिवनी’त वसूल झाले केवळ २५ लाख रुपये