विजय ताठे यांच्या शेतावर सेंद्रिय शेती प्रकल्प कार्यशाळा घेण्यात आली.
शेतीचा उत्पादन खर्च कमी करून सेंद्रिय पद्धतीने शेती करणे, एक गाव एक वाण, तसेच बीबीएफ तंत्रज्ञान इत्यादींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने पानगव्हाण येथे शेतीशाळा घेण्यात आली. कृषी विभागाच्या एक गाव एक वाण या धोरणाबाबत मंडल कृषी अधिकारी संतोष चौधरी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. झिरो बजेट सेंद्रिय शेतीबाबत प्रा. विजय ताठे यांनी स्वानुभव कथन केले, तर बीबीएफ तंत्रज्ञान पेरणीसह पिकावर येणारे रोग तसेच त्याचे निराकरण, शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या आदींबाबत कृषी पर्यवेक्षक सुनील शिंदे, कृषी सहाय्यक कैलास घाडगे पाटील, आत्माचे रामेश्वर पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य अनुरुद्ध ताठे यांनी केले.