लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर पुरविण्यात येणारे खत ‘पॉस मशीन’व्दारेच वितरित करण्याच्या शासनाच्या स्पष्ट सूचना आहेत; मात्र ही पद्धत टाळून काही कृषी निविष्ठा विक्रेते खतविक्री करित होते. यामुळे उपलब्ध खताचा नेमका साठा कळणे अशक्य झाले. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने जिल्ह्यातील शंभरावर कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेऊन ‘पॉस मशीन’ची तपासणी केली. त्याचा सकारात्मक परिणात झाला असून आता ठराविक पद्धतीनेच खतविक्री सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.अनुदानित खताची विक्री ‘पॉस मशीन’व्दारेच करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या; मात्र जिल्ह्यात अनेक कृषी सेवा केंद्रांकडून त्याचे उल्लंघन करण्यात आले. अनेकांनी आॅफलाईन पद्धतीनेच अनुदानित रासायनिक खतांची विक्री केली. परिणामी, जिल्ह्यात युरिया आणि रासायनिक खताचा तुटवडा निर्माण झाला असताना आॅनलाईन रेकॉर्डवर मात्र अनुदानित खत मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसत आहे. यामुळे शासनाकडे खताची मागणी नोंदविताना अडचण निर्माण झाली. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेऊन अनुदानित खत ‘पॉस मशीन’नेच विक्री करण्याच्या सूचना दिल्या. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून अनुदानित खताची विक्री किती झाली आणि शिल्लक साठा किती, याचा बºयापैकी मेळ लागल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी दिली.
शंभरावर कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 3:40 PM