वाशिम, दि. २६-जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढून शेतकर्यांना त्याचा फायदा व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने नरेगा रोजगार योजनेंतर्गत पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजना राबविली जात आहे. याअंतर्गत यावर्षी जिल्ह्यात सहा हजार सिंचन विहिरी उभारण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.सिंचन प्रकल्पाचा फायदा शेतकर्यांना व्हायला हवा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतजमीन सिंचनाखाली येऊन शेतकर्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये व गावागावांतून या योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी यावेळी सांगितले. तसेच संपूर्ण जिल्ह्यात सहा हजार सिंचन विहिरींचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही द्विवेदी म्हणाले.गतवर्षी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ४ हजार १११ सिंचन विहिरी निर्माण करण्यात आल्याची माहिती देत, यावर्षी पालकमंत्री सहस्त्र विहीर योजनेंतर्गत शेतकर्यांची अथवा शासनाची फसवणूक होणार नाही, याबाबत विशेष खबरदारी बाळगण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. वाशिम जिल्ह्यामध्ये १0८ शेतकर्यांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे सुरु आहेत, अशी माहितीदेखील यावेळी त्यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यात सहा हजार सिंचन विहिरींचे उद्दिष्ट
By admin | Published: December 27, 2016 2:26 AM