लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, २ व ३ नोव्हेंबर रोजी लोककलावंतांच्या माध्यमातून शौचालय बांधकामाचा गजर करण्यात आला. ‘उघड्यावरील शौचवारी थांबवा आणि शौचालयाचा वापर करा’ असे आवाहन लोककलावंतांनी केले. जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विशेष कुटुंब संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सामूहिक माध्यमातून गावोगावी भेटी देऊन शौचालय नसलेल्या कुटुंबीयांशी संवाद साधणे आणि शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन करणे, असा हा उपक्रम सुरू आहे. मंगरूळपीर तालुक्यातील कोळंबी येथे लोककलावंतांच्या माध्यमातून गजर करण्यात आला. चिमुकल्यांनीदेखील विविध घोषणा देत शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रिसोड तालुक्यातील हराळ, आसेगाव पेन, वनोजा, व्याड, रिठद, चिखली या गावांना भेटी देण्यात आल्या. शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरी भेटी देऊन शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शौचालय नसलेल्या कुटुंबाच्या घरावर लाल रंगाचे (खतरा/धोका) स्टिकर लावण्यात आले. संबंधित कुटुंबाकडून शौचालय बांधकाम करण्याचे आश्वासन घेण्यात आले. मालेगाव तालुक्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्या नेतृत्वात आणि जि.प. व पं.स. सदस्य, स्वच्छ भारत मिशनच्या चमूने पांगरी कुटे, डोंगरकिन्ही, मुंगळा, मेडशी यासह विविध गावांना भेटी देत, शौचालय न बांधलेल्या कुटुंबांशी चर्चा केली. उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, जि.प. सदस्य विकास गवळी, मो. इमदाद शेख, गट विकास अधिकारी थोरात, पं.स. सदस्य विजय अंभोरे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एम. खान, उपअभियंता नीलेश राठोड, स्वच्छ भारत मिशनचे विजय नागे, पुष्पलता अफुणे, प्रदीप सावळकर, शंकर आंबेकर, अभिजित दुधाटे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.महागाव : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत (ग्रामीण) गाव हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प महागाव येथील ग्रामपंचायत व नागरिकांनी केला आहे. सभापती छाया सुनील पाटील यांच्या हस्ते काही शौचालयाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी भारसाकळे, नवनिर्वाचित सरपंच अनिल मवाळ, नवनिर्वाचित सदस्य रेखा सदाशिव लांडे, अशोक जमधाडे, नामदेव गायकवाड, ज्ञानेश्वर सरकटे, विलास हुंबाड, सविता गजानन जमधाडे, स्वाती विष्णू बदर, चंद्रकला दिनेश मवाळ, उषा जालींदर जमधाडे तसेच भगवान गायकवाड, रामदास बदर, बबन बदर, शंकर हुंबाड, हिंमत हुंबाड, राजू काळे, मोतीराम लांडे, श्रीकिसन काळे, गजानन मवाळ, मनोज मवाळ, भीमराव जमधाडे, मोहन जमधाडे, जनार्धन जमधाडे, रमेश जमधाडे, भोजराज जमधाडे, समाधान जमधाडे, वसंता निळशे, नंदकुमार धाबे, भगवान जमधाडे, गणेश ठाकरे, केशव जाधव यांच्यासह महिला व पुरुषांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस आदींनी गाव स्तरावर कुटुंबीयांशी संवाद साधण्याची मोहीम उघडून जनजागृती करण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येते.
जिल्हाभरात लोककलावंतांचा ‘गजर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:06 AM
वाशिम : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, २ व ३ नोव्हेंबर रोजी लोककलावंतांच्या माध्यमातून शौचालय बांधकामाचा गजर करण्यात आला. ‘उघड्यावरील शौचवारी थांबवा आणि शौचालयाचा वापर करा’ असे आवाहन लोककलावंतांनी केले.
ठळक मुद्देविशेष कुटुंब संपर्क अभियान शौचालय बांधकामांसंदर्भात जनजागृती मोहीम