लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : तालुक्यातील भर जहाँगीर येथील शेकडो महिलांनी गुरूवार, २४ आॅगस्ट रोजी गावातून दारूविक्री हद्दपार करण्याच्या मागणीसाठी ‘एल्गार’ पुकारत पोलिस प्रशासनाकडे धाव घेतली. यावेळी ठाणेदारांकडे दारूबंदीबाबत निवेदन सादर करण्यात आले. भर जहाँगीर हे गाव राजकियदृष्ट्या प्रसिद्ध असून या गावाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या पहिल्याच वर्षी जिल्ह्यातून चार लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे. सद्या मात्र अवैध दारूविक्रीमुळे गावाची प्रतिमा मलिन झाली असून घरातील कर्ते पुरूष दारूच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे शासनाने महामार्गापासून ठराविक अंतरावरील दारूची दुकाने बंद केली असताना दुसरीकडे मात्र भर जहाँगीरमध्ये सर्रास दारूविक्री केली जात आहे. यामुळे संतापलेल्या महिलांनी नवनिर्वाचित तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सदाशिव डोंगरे, उपाध्यक्ष गजानन सानप, दिनकर महाराज जायभाये, सरपंच रघुनाथ गरकळ, उपसरपंच दगप्पा काष्टे, गजानन जायभाये, राजू सांगळे, पंढरी सभादिंडे, केशव डोंगरे आदिंसमवेत रिसोड पोलिस स्टेशन गाठून ठाणेदारांशी याबाबत संवाद साधला. दरम्यान, भर जहाँगीरमध्ये सुरू असलेली बेकायदा दारूविक्री तत्काळ बंद केली जाईल, अशी ग्वाही यावेळी ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी दिली.
दारूबंदीसाठी महिलांचा ‘एल्गार’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 7:10 PM
रिसोड (वाशिम) : तालुक्यातील भर जहाँगीर येथील शेकडो महिलांनी गुरूवार, २४ आॅगस्ट रोजी गावातून दारूविक्री हद्दपार करण्याच्या मागणीसाठी ‘एल्गार’ पुकारत पोलिस प्रशासनाकडे धाव घेतली. यावेळी ठाणेदारांकडे दारूबंदीबाबत निवेदन सादर करण्यात आले.
ठळक मुद्देभर जहाँगीर येथील महिलांनी पोलिस प्रशासनाकडे धाव घेतली