शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

जिल्हा परिषदेत आघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत बिघाडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 4:49 PM

Gram Panchayat Election शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस हे तिनही पक्ष व स्थानिक नेते ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र एकत्र येऊ शकले नाहीत.

- संतोष वानखडेवाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक व सत्ता स्थापनेसाठी एकजूट दाखविणारे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस हे तिनही पक्ष व स्थानिक नेते ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र एकत्र येऊ शकले नाहीत. पॅनल, आघाडीच्या नावाखाली स्थानिक पातळीवर निवडणूक लढविली जात असून, यामध्ये कुणाची सरशी होणार याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस असे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या बहुतांश निवडणूका या महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यातही जानेवारी २०२० मध्ये महाविकास आघाडीच्या नावाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्यात आल्या होता. जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन भाजपा व जिल्हा जनविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काही गट, गणाचा अपवाद वगळता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा एकत्रितपणे सांभाळली. एका वर्षानंतर कोरोनाकाळात जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्याने स्थानिक पातळीवर पॅनल, आघाडीच्या नावाखाली निवडणूक लढविली जात आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्रितपणे प्रचार करणारे सेना, कॉंग्रेस व राकॉंचे स्थानिक नेते, कार्यकर्ते हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात मात्र अनेक ठिकाणी एकमेकांविरूद्ध उभे ठाकल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होत आहे. निकालानंतर दावे, प्रतिदावेग्रामपंचायत निवडणूक ही पक्ष किंवा महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविली जात नाही. मात्र, निवडणूक निकालानंतर ग्रामपंचायत आमच्याच ताब्यात, एवढ्या ग्रामपंचायतींवर आमचाच झेंडा, असे दावे, प्रतिदावे पक्ष व नेत्यांकडून करण्यात येते. निवडणूक निकालानंतर दावे, प्रतिदाव्यावरूनही राजकारण तापविले जाते. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी झालेली नाही. स्थानिक पातळीवर पॅनल, आघाडीतर्फे निवडणूक लढविली जाते.- चंद्रकांत ठाकरे,जिल्हाध्यक्ष राकॉं ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी नाही. निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीबाबत ठरविले जाईल.- अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक,जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक पातळीवर लढविण्यात येते. या निवडणुकीत महाविकास आघाडी झालेली नाही.- सुरेश मापारी,जिल्हा प्रमुख, शिवसेना

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायतwashimवाशिमcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना