लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बियाणे न उगवल्यासंदर्भात प्राप्त तक्रारीवरून कृषी सेवा केंद्रांना जबाबदार धरीत गुन्हे दाखल केले जात आहेत तर दुसरीकडे वरिष्ठ अधिकाºयांचा दबावही वाढत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्याासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र संचालकांनी १० जुलैपासून पुकारलेला बंद १२ जुलै रोजीदेखील कायम होता. जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद असल्याने खते, किटकनाशक खरेदी करता न आल्याने शेतकºयांची गैरसोय झाली. पेरलेले बियाणे न उगविल्यासंदर्भात शेतकरी व कृषी सेवा केंद्र संचालकांमध्ये गैरसमज निर्माण झाला असून, हा गैरसमज दूर व्हावा, बोगस बियाणे प्रकरणी कृषी सेवा केंद्र संचालकांना जबाबदार धरण्यात येऊ नये, शेतकºयांकडून शिवीगाळ व मारहाण होण्याच्या शक्यतेने संरक्षण द्यावे, वरिष्ठांनी दबाव आणू नये यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वीदेखील जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र संचालकांनी दोन दिवशीय बंद पुकारला होता. परंतू, या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात १० त १२ जुलै या दरम्यान कृषी सेवा केंद्र संचालकांनी कडकडीत बंद पुकारला आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र संचालक सहभागी झाल्याने दुकाने कडकडीत बंद आहेत. यामुळे बियाणे, किटकनाशक, खते खरेदी करण्यासाठी शहरात आलेल्या शेतकºयांना खाली हात परतावे लागले
तिसऱ्या दिवशीही सर्व कृषी सेवा केंद्र बंदच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 4:21 PM