लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांना शह देण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सर्वांना एकत्र करुन सर्व समावेशक आघाडी तयार करुन खरेदी विक्री संघ व बाजार समितीची सत्ता हस्तगत केली. तदनंतर सहकार नेते सुरेश गावंडे यांच्या रामतीर्थ येथील निवासस्थानी मातब्बर नेते व संचालकांच्या उपस्थितीत बाजार समितीचे सभापती म्हणून डॉ. संजय रोठे यांना दोन वर्षांसाठी सर्वानुमते विराजमान केले; परंतु ज्या नेत्यांच्या विरोधात सर्वसमावेशक सत्ता आणली त्याच नेत्याच्या गळाला आघाडीचे दोन नेते लागल्याने कार्यकाळ संपत आलेले सभापती पदाचा राजीनामा देतील काय, असा प्रश्न पडला आहे.तालुक्यातील महत्त्वाच्या बाजार समिती व खरेदी विक्री संघ ताब्यात घेण्यासाठी माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांच्या विरोधात स्थानिक नेते माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, माजी जि.प.अध्यक्ष अरविंद इंगोले, सहकार नेते सुरेश गावंडे यांनी सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवून जनतेचा विश्वास संपादन केला आणि बहुमतांनी दोन्ही संस् था हस्तगत केल्या. तेव्हा सभापतीची माळ कुण्याच्या गळ्यात टाकायची, यासाठी रामतीर्थ येथे बैठक बोलावून या सर्व नेत्यांच्या समोर दोन वर्षांसाठी डॉ. संजय रोठे यांना सभापती करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे हा कार्यकाळ येत्या २४ सप्टेंबरला संपत आहे. नवीन सभापती होण्यासाठी पावले उचलणे आवश्यक अस ताना आघाडीच्या दोन नेत्यांनी बुधवारी स्थानिक विश्राम गृहावर बाजार समितीच्या संचालकांना मेजवानी दिली व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीला सहा-सात संचालक उपस्थित होते. दोन ने त्यांनी वेगळी बैठक बोलावल्याने विद्यमान सभापती राजीनामा देतील काय, याबद्दल संचालक आघाडी फुटीच्या उंबरठय़ावर असल्याचे दिसत आहे. मानोरा पंचाय त समिती माजी जि.प. अध्यक्ष अरविंद पाटील यांनी माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांच्या बाजूने उभे राहिल्याने तेव्हाच सर्वसमावेशक आघाडीमध्ये उभी फुट पडली होती, असे बोलल्या जात आहे.
तालुक्यातील घडामोडी काही असल्या, तरी बाजार समि तीच्या भविष्यासाठी आम्ही तिघेही एकच आहोत. सभाप तींनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यास त्यांच्या जागी पुन्हा चांगला, कर्तव्यतत्पर सभापती व्हावा, अशी माझी इच्छा आहे.- सुरेश गावंडे, सहकार नेते, मानोरा
बाजार समितीची सभापतीची जबाबदारी दोन वर्षांसाठी हो ती, हे खर आहे; पण सर्व समावेशक आघाडीचे तिन्ही नेते जे सांगतील तो निर्णय मान्य राहील. २४ सप्टेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. - डॉ.संजय रोठे, सभापती, बाजार समिती मानोरा