वाढती महागाई आणि साठेबाजीला आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी मूग वगळता इतर सर्व कडधान्याच्या साठेबाजीवर मर्यादा आणल्या आहेत. हा निर्णय ठोक, किरकोळ विक्रेत्यांसह आयातदार आणि दालमिलच्या मालकांसाठी ऑक्टोबर २०२१ पर्यंत लागू राहणार आहे. केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण विभागाकडून या संदर्भातील आदेश जारी करण्यात आला असून, तो तत्काळ प्रभावाने लागूही करण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयाचा व्यापारीवर्गाकडून विरोध करण्यात येत असून, या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवार, ५ जुलैपासून बाजार समित्या बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी मंडळाकडून प्राप्त झाली आहे.
-------------
सर्व बाजार समित्यांना व्यापाऱ्यांचा अर्ज
केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतमाल स्टॉक लिमिटच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी सोमवार, ५ जुलैपासून बाजार समित्या बंद ठेवण्याबाबत अर्ज दिला आहे. त्यामुळे सोमवारपासून पुढील सूचनेपर्यंत बाजार समित्यांमधील खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार बंद राहणार असल्याची सूचना बाजार समित्यांनी दिली आहे.
----------
कोट: शासनाच्या स्टॉक लिमिट निर्णयाचा विरोधात बाजार समित्या बंद राहणार असून, यात खासगी बाजार समित्याही सहभागी होणार आहेत.
-आनंद चरखा,
अध्यक्ष, व्यापारी युवा मंडळ, वाशिम