लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : हमीदराने शेतमाल खरेदी न केल्यास व्यापाºयांवर कारवाईची कुठलीही तरतूद नसल्याने, व्यापाºयांनी शेतमालाची खरेदी पुर्ववत सुरू करण्यासंदर्भातील पणन संचालनालयाचे पत्र जिल्हा उपनिबंधकांमार्फत व्यापाºयांना प्राप्त झाले. त्याअनुषंगाने बुधवार, ५ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार पूर्ववत झाले. दुसरीकडे बाजार समित्या बुधवारपासून पूर्ववत होणार, याची कल्पना शेतकºयांना नसल्याने बुधवारी फारशी आवक नसल्याचे दिसून आले.आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतकºयांकडून शेतमाल खरेदी करणाºया व्यापाºयांचा परवाना रद्द करण्याची तरतूद बाजार समिती कायद्याच्या कलम २९ अन्वये पूर्वीपासूूनच लागू आहे. यामध्ये सुधारणा करून कायद्याचा भंग करणाºया व्यापाºयास एक वर्षाची कैद व ५० हजार रुपये दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आल्याचा तोंडी संदेश २५ आॅगस्टदरम्यान व्यापाºयांपर्यत पोहोचला होता. त्यामुळे कारवाईच्या भीतीपोटी व्यापाºयांनी २७ आॅगस्टला रोजी बाजार समित्यांकडे पत्रव्यवहार करून शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली. तेव्हापासून मानोºयाचा अपवाद वगळता उर्वरीत बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद होते. त्यानंतर पणन संचालनालयाने भूमिका स्पष्ट करीत व्यापाºयांनी शेतमाल खरेदी पूर्ववत करावी, असे आवाहन केले होते. आधारभूत किंमत नव्हे; तर वैधानिक अधिमुल्यांकित किंमतीबाबतचा (एसएमपी) तो निर्णय असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ३० आॅगस्ट रोजी स्पष्ट केले होते. मात्र, जोपर्यंत अधिकृत तथा लेखी निर्णय हातात पडत नाही, तोपर्यंत शेतमाल खरेदी केली जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा व्यापाºयांनी घेतला होता. १ सप्टेंबर रोजी पणन संचालनालयाने जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविलेल्या लेखी पत्रात अधिनियम १९६३ व १९६७ मध्ये हमीदरापेक्षा कमी दराने व्यापाºयांनी शेतमाल खरेदी केल्यास दंडाची अथवा शिक्षेची कुठलीही तरतूद नाही. त्यामुळे व्यापाºयांनी शेतमाल खरेदी पुर्ववत सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. या सूचनांच्या अनुषंगाने कारंजा बाजार समितीचे व्यवहार ३ सप्टेंबरपासून पूर्ववत झाले होते तर उर्वरीत वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी बंद होती. ४ सप्टेंबर रोजी बाजार समिती प्रशासन व व्यापाºयांमध्ये झालेल्या यशस्वी चर्चेनुसार, ५ सप्टेंबरपासून रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरूळपीर येथील बाजार समित्यांमध्ये शेतमालाची खरेदी पूर्ववत झाली.मंगरूळपीर व वाशिम येथे पहिल्याच दिवशी नवीन मूग विक्रीसाठी आल्याचे दिसून आले. रिसोड येथे बाजार समिती पूर्ववत होणार असल्याची कल्पना शेतकºयांना नसल्याने फारशी आवक नसल्याचे दिसून आले. मालेगाव येथेही हीच परिस्थिती दिसून आली.
वाशिम जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 2:46 PM