वाशिम जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी एकत्रित येत शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीची आज वाशिम येथे सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात येऊन पुढील दिशा ठरविण्यात आली.
या सभेला आमदार किरणराव सरनाईक यांनी आकस्मिक भेट दिली. या सभेला शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष राजकुमार बोनकिले, विज्युक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल काळे, शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पसारकर, सचिव रामराव कायंदे, पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांत उपाध्यक्ष विनायक उज्जैनकर, जिल्हाध्यक्ष प्रा. मंगेश धानोरकर, उपाध्यक्ष राम अवचार, प्रसिद्धी प्रमुख सुनील कोंगे, शिक्षक संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष प्रा. विजय भड, उपाध्यक्ष प्रवीण कदम, उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य जावेद मोहम्मद इक्बाल, सचिव सय्यद अयुब, विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीचे राज्य पदाधिकारी प्रा. प्रशांत कवर, प्रा. दिगंबर गुडदे, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष प्रा. रमेश आरू, अमरावती विभागीय शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन कोरडे, प्रा. सोनुने, चंद्रकांत शिंदे,तालुकाध्यक्ष संतोष नायक, विदर्भ कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल काळे, सचिव गोपाल गावंडे, प्रयोगशाळा परिचर संघाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल काळे आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
............
सी. एम. पी. ची पायाभरणी वाशिम जिल्ह्यातून
काही महिन्यांपासून राज्य व जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतरांच्या वेतनात अनियमितता झाली आहे. त्यामुळे वेतन नियमित होण्यासाठी सी. एम. पी. (अर्थ व्यवस्थापन प्रणाली) लागू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संपूर्ण राज्यातील वेतन सी. एम. पी.व्दारे करण्यासाठी प्रयत्न करू आणि याची सुरुवात वाशिममधून करून सी. एम. पी. ची पायाभरणी करू असे आमदार सरनाईक म्हणाले.