लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भाजपा सरकार शेतकरी हिताचे असून, यापूर्वी असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या कारकिर्दीत १९ हजार गावांत वीज नव्हती. आता केवळ काही शेकडा गावांत वीज नाही. २०१८ संपेपर्यंत एकही गाव असे राहणार नाही, ज्या गावात वीज पुरवठा राहणार नाही. तशी उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख शिवराज कुळकर्णी यांनी केले. वाशिम येथील भाजपाच्या कार्यालयामध्ये १५ जून रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांची उपस्थिती होती. यावेळी कुळकर्णी यांनी मोदी सरकारला २६ मे रोजी तीन वर्ष पूर्ण झाले असून, या काळात त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा सांगण्यासाठी पत्रकार परिषद बोलावण्यात आली. यावेळी त्यांनी सरकारने उपेक्षितांसाठी केलेल्या भरीव कार्याबाबत, बारा रुपयांमध्ये विमा, उज्ज्वला योजना, भीम अॅप्ससह भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी शासनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी सुध्दा शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजना, जिल्ह्यात लागलेल्या १ हजार व लागणार असलेल्या १ हजार ट्रान्सफार्मरबाबत माहिती दिली. --
पुढील वर्ष संपेपर्यंत सर्व गावात वीज - शिवराज कुळकर्णी
By admin | Published: June 16, 2017 1:21 AM