लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ‘क्यार’ व ‘महा’ चक्री वादळामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना दुसºया हफ्त्याची आर्थिक मदत म्हणून १२३ कोटी ४८ लाख ५८ हजार रुपयांचा निधी १३ डिसेंबरच्या निर्णयान्वये प्राप्त झाला. २६ डिसेंबरपर्यंत १२० कोटी ९७ लाख रुपये अर्थात ९८ टक्के निधीचे वाटप पात्र शेतकºयांना झाले आहे.राज्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मधील नैसर्गिक आपत्तीमुळे वाशिम जिल्ह्यात शेतीपिकाचे नुकसान झाले होते. बाधित झालेल्या शेतकºयांना मदत देण्यासाठी शासन निर्णयान्वये दोन हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार एवढा निधी वितरीत करण्यास मान्यता दिली होती. यामधील पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यास ५६ कोटी ५१ लाख १६ हजारांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून जिल्ह्यातील ७४ हजार शेतकºयांना प्रशासनाच्यावतीने मदत वितरण करण्यात आले.त्यानंतर १३ डिसेंबरच्या निर्णयान्वये दुसºया टप्प्यातील निधी मिळाला आहे. यात अमरावती विभागासाठी ९६० कोटी ५४ लाख ९२ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील बाधित शेतकºयांना १२३ कोटी ४८ लाख ५८ हजार रुपयांच्या निधीचा समावेश आहे. यामध्ये वाशिम तालुक्यासाठी २५.८६ कोटी रुपये, रिसोड तालुक्यासाठी २२.२८ कोटी, कारंजा तालुक्यासाठी २०.६७ कोटी, मालेगाव तालुक्यासाठी २०.३२ कोटी, मानोरा तालुक्यासाठी १५.४९ कोटी, मंगरूळपीर तालुक्यासाठी १८.८२ कोटी रुपयांचा समावेश आहे. हा निधी संबंधित पात्र शेतकºयांना तातडीने वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी सर्व तहसिलदार व संबंधित बँक प्रशासनाला दिल्या होत्या. त्याअनुषंगाने २६ डिसेंबरपर्यंत १२३ कोटी ४४ लाख रुपयांपैकी जवळपास १२० कोटी ९७ लाख १२ हजार रुपये अर्थात ९८ टक्के निधीचे वाटप झाले आहे. उर्वरीत दोन टक्के निधीही या आठवड्यातच वाटप होईल, असा दावा प्रशासनाने केला. (प्रतिनिधी)