शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूच्या आकड्यातही आली घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:50 PM

CoronaVirus in Washim दिलासादायक चित्र आॅक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला पाहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, आरोग्यासंदर्भात नागरिकांची जागरूकता यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूच्या आकड्यातही घट येत असल्याचे दिलासादायक चित्र आॅक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला पाहावयास मिळत आहे.जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण हा मेडशी ता. मालेगाव येथे ३ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यातच कुकसा फाटा ता. मालेगाव येथे दोन आणि मुंबईवरून मालेगावला परत येत असताना सहा जणांना कोरोना संसर्ग झाला. मे व जून महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. जुलै महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली. आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या आकड्याचा स्फोट झाला. सप्टेंबर अखेर जिल्ह्यात ४३८१ अशी कोरोनाबाधितांची एकूण संख्या होती. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली तसेच नागरिकही आरोग्याबाबत सतर्क झाल्याने आॅक्टोबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालिची घट येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. आॅक्टोबर महिन्याच्या सुरूवातीच्या आठ दिवसात कमी प्रमाणात रुग्ण आढळून आले तसेच मृत्यूच्या संख्येतही घट आली.

सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे तसेच मृतकांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून येते. जोखीम गटातील नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.-डॉ. अविनाश आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या