लोकमत न्युज नेटवर्कदेपूळ (वाशिम) : लघूपाटबंधारे विभाग (बांधकाम) वाशिम अंतर्गत उभारलेल्या वारा जहॉ, सिंचन प्रकल्पातील बाधित पाणंद रस्त्यासाठी सुरू असलेल्या पर्यायी रस्त्याचे काम एका शेतकºयाच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यावरून रखडले आहे. त्यामुळे इतर शंभर शेतकºयांच्या वहिवाटीचा प्रश्न गंभीर झाला असून, सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे किंवा आगामी खरीप हंगामात होणाºया नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित शेतकºयांनी केली आहे. याबाबत त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनही सादर केले आहे. लघूपाटबंधारे विभाग (बांधकाम) वाशिम अंतर्गत उभारलेल्या वारा जहॉ, सिंचन प्रकल्पातील बाधित पाणंद रस्त्याला पर्यायी शिवार रस्त्याचे गतवर्षी सुरू करण्यात आले. यासाठी तीन शेतकºयांची जमीनही संपादित करण्यात आली आणि रस्त्याचे काम ७० टक्के पूर्णही झाले; परंतु ज्या शेतकºयांची जमीन या रस्त्यासाठी संपादित करण्यात आली. त्यापैकी एका शेतकºयाच्या संपादित जमिनीपैकी ३ आर क्षेत्रासाठी पोटखराब जमिनीचा मोबदला देण्यात आला. त्यामुळे आपले नुकसान झाल्याचे मत शेतकºयाने व्यक्त केले असून, याबाबत दुरुस्ती करण्यासाठी सदर रस्त्याचे काम थांबविले आहे. संबंधित शेतकरी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या या वादामुळे या रस्त्यावर शेती असलेल्या १०० शेतकºयांची पंचाईत झाली असून, खरीप हंगामात पेरणीसह इतर कामांसाठी त्यांना शेतात येजा करणे कठीण झाले आहे. सदर वाद मिटवून रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे हताश झालेल्या देपूळ येथील शेतकरी पांडुरंग गंगावणे, गजानन भेंडेकर यांच्यासह इतर शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्याची मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, तसेच कार्यकारी अभियंत्यांनाही दिल्या आहेत. पर्यायी शिवार रस्त्यासाठी संपादित जमिनीत एका शेतकºयाचे ३ आर क्षेत्र पोटखराब म्हणून मोजून मोबदला देण्यात आला. सदर शेतकºयाने आपला हक्क देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम रखडल्याने खरीप हंगामात शेती कशी करावी, असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला आहे.- पांडुरंग गंगावणे, शेतकरी, देपूळ
पर्यायी पाणंद रस्त्याचे काम रखडले; शंभर शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 5:25 PM