यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी एस. पी. मुळे यांनी केले. तर कार्यक्रमाला तहसीलदार नरसय्या कोंडागुरले, पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे उपस्थित होते. त्याचबरोबर, पांडुरंग कोठाळे, सचिन सुर्वे, रणजित भगत, गणेश पवार, किशोर देशमुख, अवी चौधरी, तुकाराम काळे, डॉ. उदगिरे, आनंद इंगोले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप इंगळे यांनी केले. शिबिरामध्ये ६० युवकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रक्तदानासाठी शासकीय रक्तपेढी, वाशिम यांचे सहकार्य लाभले.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन तसेच प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले. या उपक्रमाला आशिष अवचार, अजय गवारगुरू, मारुती ठोके, सुरज खाडे, श्याम ठाकरे, रवी खडसे, प्रशांत मोरे, सुरज इंगोले, सनी शुगारे, शुभम गादेकर, दिपैन तायडे, अनुप इंगळे, हर्षल निवाने, राजकुमार मनवर, श्रीकांत ठाकरे, अजय खोडे, विक्की चव्हाण, लखन गादेकर, ओम ठाकरे, सुमित मेटकर, पवन खाडे, अमित मेटकर, वैभव ठाकरे, महेश फुके, सप्रेम मनवर यांचे सहकार्य लाभले.