लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील रवि माधवराव मारशेटवार या प्रयोगशिल शेतकऱ्याने एक, दोन; नव्हे तर चक्क हजार झाडांची आमराई ती देखील माळरानावर फुलविली. त्यात लागवड करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ५१ प्रजातींच्या आंब्यांपासून त्यांना चांगले उत्पन्न मिळायला लागले असून ८० रुपये किलो याप्रमाणे सद्या ते स्वत: आंब्याची विक्री करित आहेत. त्यांच्या आमराईला परजिल्ह्यातील शेतकरी भेटी देवून माहिती जाणून घेत आहेत. वाशिममधील रवि मारशेटवार यांनी सिव्हील इंजिनिअरिंग केले असून त्यांना ह्यसल्तनत आॅफ ओमानह्णमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी देखील लागली होती. यायोगे मनुष्याला ज्याची सर्वाधिक ओढ असते, त्या ऐशोआरामाची त्यांना सुवर्ण संधी चालून आली होती. मात्र, मायभूमी-जन्मभूमीची ओढ लागलेल्या मारशेटवार यांनी ती नोकरी सोडून शेतीला आपलेसे केले. प्रारंभी त्यांनी माळरानावर दोन हेक्टर पडिक शेत विकत घेतले. त्याला जेसीबीने सपाट करून त्यात धरणातील काळी माती भरली. एका हेक्टरमध्ये हापूस, केशर, दशेरी, आम्रपाली, दुधपेढा, मल्लिका, मंजिरी, हुर, काळाखोबरा, कलेक्टर, महाराजा आॅस्ट्रेलियन केन्ट, सिंगणवाडी, बाबोली पुनासा, साखरगोटी, कागदी हापूस, वनराज, बारमासी, केळ्या, शेप्या, सिंधू, पसऱ्या ,रॉयल स्पेशल, पश्चिम बंगालचा हिमसागर यासह विविध गावरानी जातीच्या ५१ आम्रवृक्षांनी लागवड केली. यंदा त्यातील अनेक झाडांना चांगली फळधारणा झाल्याने मेहनतीचे चीज झाले असून ८० रुपये किलोप्रमाणे त्याची विक्री सुरू असल्याची माहिती मारशेटवार यांनी दिली.