शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

रुग्णवाहिका उभी राहते रिसोडपासून २५ किलोमिटर अंतरावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 5:48 PM

रिसोड (वाशिम) : आरोग्य विभागाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रिसोडपासून २५ किलोमिटर अंतरावर असलेल्या रिठद येथे उभी राहत असून ती ऐनवेळी येण्यास विलंब लावत असल्याने रुग्णांना उपचारासाठी इतरत्र हलविताना मोठा प्रश्न उभा राहत आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील १०७ गावांपैकी रिसोडला जोडून असलेल्या गावांसह शहरातील रुग्णांचा ग्रामीण रुग्णालयाशी आरोग्यविषयक दैनंदिन संबंध येतो.ग्रामीण रुग्णालयाकडे स्वतंत्र १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नसल्याने रिठद आणि केशवनगर येथे असणाºया रुग्णवाहिकेस बोलाविले जाते. मात्र, या रुग्णवाहिकेस येण्यास विलंब लागत असल्याने रुग्णाची प्रकृती अधिकच बिघडत असल्याचे प्रकार घडले आहेत.

- शीतल धांडेरिसोड (वाशिम) : तालुक्यातील १०७ गावांचा दैनंदिन आरोग्यविषयक संबंध येणाºया येथील ग्रामीण रुग्णालयास अपघातांमध्ये गंभीर जखमी होणाºया रुग्णांकरिता स्वतंत्र रुग्णवाहिकेची गरज भासत आहे. असे असताना आरोग्य विभागाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रिसोडपासून २५ किलोमिटर अंतरावर असलेल्या रिठद येथे उभी राहत असून ती ऐनवेळी येण्यास विलंब लावत असल्याने रुग्णांना उपचारासाठी इतरत्र हलविताना मोठा प्रश्न उभा राहत आहे. अशाप्रसंगी जखमींच्या नातेवाईकांना नाईलाजास्तव खासगी रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 

तालुक्यातील १०७ गावांपैकी रिसोडला जोडून असलेल्या गावांसह शहरातील रुग्णांचा ग्रामीण रुग्णालयाशी आरोग्यविषयक दैनंदिन संबंध येतो. असे असताना या रुग्णालयात कर्मचारी अनुशेष, सुविधांचा अभाव असण्यासोबतच रुग्णालयास अद्याप अपघाताप्रसंगी वापरता यावी, अशी हक्काची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका मिळालेली नाही. यामुळे अधूनमधून घडणाºया अपघातांमध्ये गंभीर जखमी होणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची ऐनवेळी त्रेधातिरपिट उडत आहे. ग्रामीण रुग्णालयाकडे स्वतंत्र १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नसल्याने जखमी अवस्थेतील रुग्णांना वाशिम अथवा अकोला येथील रुग्णालयात हलविण्याचा प्रसंग उद्भवल्यास रिठद आणि केशवनगर येथे असणाºया रुग्णवाहिकेस बोलाविले जाते. मात्र, या रुग्णवाहिकेस येण्यास विलंब लागत असल्याने रुग्णाची प्रकृती अधिकच बिघडत असल्याचे प्रकार यापुर्वी अनेकवेळा घडले आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बºयापैकी असलेल्या रुग्णांचे नातेवाईक खासगी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून वाशिम अथवा अकोला येथील रुग्णालय गाठत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, ही समस्या निकाली काढण्याकरिता विद्यमान लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाने जाणीवपूर्वक लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे. 

रिसोडच्या ग्रामीण रुग्णालयाकडे १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका आहे. मात्र, ही रुग्णवाहिका गर्भवती मातांना ने-आण करण्यासाठी वापरली जाते. रुग्णवाहिका उपलब्ध असल्यास अपघातांमधील जखमींचीही मदत केली जाते. - डॉ. श्रीधर चोपडे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, रिसोड

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड