जऊळका रेल्वे: वाशिम जिल्ह्यातून धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेस या रेल्वेगाडीचा थांबा मिळावा, यासाठी अमानवाडी येथील सरपंच आणि गावकऱ्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी थेट नांदेड गाठत तेथील रेल्वेच्या विभागीय मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन सादर के ले आहे.
वाशिम जिल्ह्यातील अमानवाडी परिसरातील ३० ते ४० गावांचा संपर्क अमानवाडी रेल्वेस्थानकाशी येतो. अमानवाडी परिसर हा दूर्गम आणि आदिवासी बहुल भाग असून, परिसरातील गावांतील लोक अमनावाडी येथे विविध कामांसाठी येजा करीत असतात. अमानवाडी ही मोठी बाजारपेठ असून, .या ठिकाणी येण्यासाठी परिसरातील लोकांना दळणवळणाच्या पुरेशा सुविधा नाहीत. विशेष म्हणजे अमानवाडी येथे मुबलक पाणी असल्याने हैदराबाद-अजमेर व इतर महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यात पाणी भरण्यासाठी येथे थांबतात. या स्टेशनवर पूर्वी मिनाक्षी एक्स्प्रेसचा थांबाही होता. या ठिकाणी रेल्वेप्रवाशांसाठी फराळपाण्याची सुविधाही आहे. या सर्व बाबींचा विचार करून अमानवाडी परिसरातील प्रवाशांना इतर ठिकाणी जाण्यासाठी, तसेच येथे येणाºया प्रवाशांना सोयीचा आधार मिळण्यासाठी इंटरसिटीचा थांबा द्यावा, अशी मागणी अमानवाडीचे सरपंच नंदकिशोर जयस्वाल, कांताबाई गणोदे, ग्यानराव कोरडे, गजानन गिते, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान गणोदे, पोलीस पाटील राजेंद्र घुगे, संजय गिते, आकाश गिते, सौरभ घुगे, बाळू मंदाडे, सचिन बासोळे, आकाश ददगाळ, निखिल ददगाळ व गावकरी मंडळीने केली आहे. यासाठी त्यांनी थेट नांदेड गाठून नांदेडच्या रेल्वे विभागीय मंडळ अधिकाºयांना निवेदन सादर केले आहे.