लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अनसिंग येथील संस्थेने खात्यात पुरेशी रक्कम न ठेवल्याने शेतकर्यांना तुरीच्या चुकार्याचे दिलेले धनादेश ह्यबाऊन्सह्ण झाले. यासंबंधी ह्यलोकमतह्णने २६ मे च्या अंकात ह्यनाफेडह्णचे धनादेश होताहेत ह्यबाऊन्सह्ण, या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची तडकाफडकी दखल घेत अनसिंग येथील विदर्भ कृषी प्रशिक्षण व पणन सहकारी संस्थेने त्यांच्या खात्यात शुक्रवारी २0 कोटी रुपये जमा केले आहेत. सोमवारपासून शेतकर्यांना धनादेशाद्वारे रक्कम मिळण्यात कुठलीच अडचण जाणार नाही, अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग ठाकरे यांनी दिली. ह्यनाफेडह्णमार्फत बाजार समित्यांमध्ये तूर खरेदी केली जात आहे. त्याचे चुकारे मात्र वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अदा केले जात आहेत. अनसिंग येथील पांडुरंग ठाकरे अध्यक्ष असलेल्या विदर्भ कृषी प्रशिक्षण व पणन सहकारी संस्थेकडे वाशिम, मालेगाव आणि अनसिंगच्या शेतकर्यांना चुकारे अदा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे; मात्र संबंधित संस्थेने आपल्या खात्यात पुरेशी रक्कम न ठेवल्यामुळे शेतकर्यांना चुकार्यापोटी देण्यात आलेले धनादेश चक्क ह्यबाऊन्सह्ण झाले. या समस्येमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या काही शेतकर्यांनी ह्यलोकमतह्णशी संपर्क साधला असता, त्यांचे म्हणणे ऐकून घेत यासंबंधी २६ मे च्या अंकात सर्वंंकष वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्याची दखल घेऊन अनसिंगच्या संस्थेने आपल्या बँक खात्यात शुक्रवारी २0 कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. सोमवारपासून ही रक्कम संबंधित शेतकर्यांना मिळणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग ठाकरे यांनी दिली.
तुरीच्या चुकाऱ्याची रक्कम खात्यात जमा!
By admin | Published: May 28, 2017 4:10 AM