पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आधार सिंग सोनोने यांच्या नेतृत्वामध्ये मालेगाव पोलीस कर्मचाऱ्यांनी विनामास्क तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली. कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी करण्यात आलेली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केलेली होती. मात्र, त्यानंतर प्रशासनाच्या पुढाकारातून गर्दी ओसरली. दुपारी १२ नंतर सर्व शहर पूर्णपणे सामसूम झाल्याचे दिसून आले. तरीही दुपार १२ वाजतापासून विनामास्क तसेच विनाकारण रस्त्यावर फिरताना काही जण आढळले. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. कोणत्याही नागरिकांनी दवाखाना आणि बँकेच्या कामाशिवाय बाहेर पडू नये. त्याकरिता आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावी अन्यथा पोलीस प्रशासन कारवाई करणार आहे असे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी सांगितले.
इनबॉक्स
मालेगांव शहरात नागरदास बायपास, लहुजी पुतळा, नगरपंचायतजवळ, शिव चौक, गांधी चौक, अकोला फाटा, जुने बसस्टँड, शेलू फाटा नवीन स्टँड, बोरगाव रोड, गांधी नगरकडे जाणार रस्ता यासह इतर ठिकाणी पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असले आणि त्यांनी केवळ चौकशी जरी केली तरी लोक घराबाहेर पडणार नाहीत, असा सूर उमटत आहे.