लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतीय स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती आंदोलन आदींमध्ये सहभागी होऊन ज्यांनी राष्ट्रहितसाठी स्वत:च्या जीवाचे बलिदान दिले, अशा व्यक्तींच्या स्मरणार्थ संपूर्ण राज्यात २०६ हुतात्मा स्मारके उभारण्यात आली आहे. त्यांचे परीरक्षण व निगा राखण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यात अमरावती विभागातील १६ स्मारकांचाही समावेश आहे.हुतात्म्यांची स्मारके उभारून सद्या ३४ ते ३५ वर्षांचा कालावधी उलटून गेल्याने सदर स्मारकांची दुरूस्ती तथा नुतनीकरणासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, राज्यभरातील २०६ हुतात्मा स्मारकांसोबतच अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात १०, बुलडाणा ३, यवतमाळ २ आणि अकोला जिल्ह्यातील एका हुतात्मा स्मारकाचा कायापालट केला जाणार आहे. यासाठी प्रत्येकी १ लाख याप्रमाणे १६ लाख रुपयांच्या निधी वितरणास सामान्य प्रशासन विभागाने ९ आॅक्टोबर रोजी मंजूरी दर्शविली आहे. सदर निधी लवकरच त्या-त्या जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाणार आहे. राज्यभरातील ३० जिल्ह्यांमधील २०६ हुतात्मा स्मारकांची दुरूस्ती, नुतनीकरणासाठी शासनाकडून प्रत्येकी १ लाख रुपये याप्रमाणे निधी वितरित केला जाणार आहे. यामाध्यमातून स्मारकांचा विकास करणे निश्चितपणे शक्य होणार आहे.- सुनील कळमकरकार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, वाशिम
अमरावती विभागातील १६ हुतात्मा स्मारकांचा होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 3:12 PM