शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आधीच निघून गेलो होतो, समाजकंटकांनी..."! हाथरस दुर्घटनेवर भोले बाबा यांची पहिली प्रतिक्रिया
2
18 राज्‍यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात डंका, यांच्याकडून मिळतो तब्बल 90 टक्के पैसा!
3
राहुल द्रविडने नेमकं काय केलं? फक्त ‘त्या’ एका गोष्टीला ‘हरवलं’ अन् टीम इंडियानं जग जिंकलं.. 
4
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार”: आदिती तटकरे
5
झारखंडमध्ये नेतृत्वबदल, चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM  
6
"जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत..." काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका
7
“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे
8
कोल्हापूर : वर्दी परिधान करण्याअगोदरच मृत्यू; २६ वर्षीय तरूणाची चटका लावणारी एक्झिट
9
“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार
10
कुटुंबातील दोन जणींना लाभ,'लाडकी बहीण'चे निकष बदलले, फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले  
11
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं
12
Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये होणार IND vs PAK महामुकाबला; सामन्याची तारीख ठरली?
13
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 
14
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
15
खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 
16
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
17
“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान
18
High Court: 'यांना उपचाराची गरज'; मोदी-शाह यांना बडतर्फ करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काय म्हणाले न्यायाधीश?
19
नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांचा पराभव होणार? शिंदे गटाचा मोठा दावा, असे आहे गणित...
20
“बालबुद्धीच्या नेत्याने PM मोदींना घाम फोडला, भाजपाला बहुमत गमवावे लागले”: संजय राऊत

आंध्रप्रदेशमधून विदर्भात आलेला ११ लाखांचा गुटखा जप्त!

By admin | Published: April 06, 2017 2:00 AM

वाशिम : आंध्रप्रदेशमधून अवैधपणे विदर्भात आणला जाणारा ११ लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफिने सापळा रचून जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळवाशिम : आंध्रप्रदेशमधून अवैधपणे विदर्भात आणला जाणारा ११ लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफिने सापळा रचून जप्त केला. या कारवाईमुळे जिल्हाभरात गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आंध्रप्रदेशमधून बुधवारला गुटखा आणला जाणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हनुमंत गिरमे यांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनात गुटखा घेऊन येणारा ट्रक रोखण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक किरण साळवे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन कातडे, संजय नंदकुले, स्वप्नील शेळके व रवी घरत यांनी अकोला महामार्गावर सापळा रचला. पोलीस पथकाने संशयीत ट्रकला थांबवून तपासणी केली असता, त्यात ११ लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला कळविली. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अजिंठेकर व यादव यांनी वाशिम येथे जप्त केलेल्या ट्रकमधील गुटखा व ट्रक जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३१ लाख रुपये असल्याची माहिती एपीआय किरण साळवे यांनी दिली. वाहनचालकासह संबंधित व्यक्तींवर वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. डीबी पथकाच्या हाती निराशा वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत डिटेक्शन ब्रँचमधील पथकाला एका ट्रकमध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून डीबी पथकाने संशयीत ट्रकचालकाला ट्रकसह पोलीस ठाण्यात आणले; मात्र तपासणी केली असता, अवैध वस्तू अथवा खाद्यपदार्थ आढळून आला नाही.