शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

अंगणवाडी सेविका, मदतनीसांचे आज जेलभरो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 1:37 AM

वाशिम: जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एल्गार पुकारला असून गुरुवार, ५ ऑक्टोबर रोजी जेलभरो आंदोलन केले जात आहे. जिल्हाभरातील सेविका व मदतनिस यांनी गुरूवारी दुपारी १२ वाजता वाशिमच्या बसस्थानकावर जमा होऊन दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार्‍या जेलभरो आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आयटक’च्या अध्यक्ष सविता इंगळे यांनी केले आहे.

ठळक मुद्देमानधनवाढीच्या प्रश्नावरून आक्रमक पवित्राजिल्हा कचेरीसमोर होणार आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एल्गार पुकारला असून गुरुवार, ५ ऑक्टोबर रोजी जेलभरो आंदोलन केले जात आहे. जिल्हाभरातील सेविका व मदतनिस यांनी गुरूवारी दुपारी १२ वाजता वाशिमच्या बसस्थानकावर जमा होऊन दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार्‍या जेलभरो आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आयटक’च्या अध्यक्ष सविता इंगळे यांनी केले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी वेळोवेळी मानधनवाढीसाठी राज्यशासनाकडे सनदशीर मार्गाने मागणी नोंदविली. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सेविका व मदतनीस यांनी जेलभरो आंदोलनाचा मार्ग अनुसरला आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचार्‍यांना मानधन वाढ व इतर मागण्या राज्यशासनाने मान्य केल्या होत्या. मात्र, दीड वर्ष उलटूनही त्या मागण्या तशाच प्रलंबित आहेत. त्यातील एकही मागणी शासनाने निकाली काढली नाही. या संतापजनक प्रकाराबद्दल अंगणवाडी कर्मचार्‍यांमध्ये शासनाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गुरूवारी केल्या जाणार्‍या जेलभरो आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही तर पुढे संपूर्ण महाराष्ट्रभर अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन छेडणार असल्याचे अंगणवाडी कर्मचार्‍यांकडून ठरविण्यात आले. तथापि, जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचार्‍यांनी वाशिम येथील बसस्थानकावर १२ वाजता जमा होऊन दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयटकचे कॉ. दिलीप उटाने, अध्यक्ष सविता इंगळे, कार्याध्यक्ष कॉ. डिगांबर एस. राठोड, सचिव मालती राठोड, उपाध्यक्ष पद्मा सोळंके, सीता तायडे, माधुरी पाठक, ज्योती देशमुख, कोषाध्यक्ष रंजना भिसे, जिल्हा संघटन संजय मंडवधरे, वाशीम तालुकाध्यक्ष किरण गिर्‍हे व सर्व पदाधिकार्‍यांनी केले आहे.-