लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड :पाणी फांउडेशन कडून राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यावर्षी राज्यातील ३० तालुक्यात राबविण्यात आली. स्पर्धेच्या माध्यमातून मोठया प्रमाणात जलसंधरणाची कामे झाली आहे. त्यामुळे या स्पधेर्चे स्वरूप व्यापक प्रमाणात व्हावे या हेतूने वर्धा ते पुणे जिल्हयातील इंदापुर तालुक्या पर्यंत सायकलने प्रवास करणाºया अनिकेत जयस्वालचे स्वागत ग्राम शेवती येथील वॉटर हीरोज कडून २३ आॅगस्ट रोजी शेवती फाटयावर शाल व श्रीफळ व पुष्यगुच्छ देउन करण्यात आले.गाव दुष्काळ मुक्त करण्यासाठी गावकºयांनी वॉटर कप ३ मध्ये सहभागी व्हावे या विषयी प्रचार प्रसार करण्यासाठी वर्धा येथील २१ वर्षीय युवक १६ आॅगस्ट रोजी वर्धा ते पुणे जिल्हयातील इंदापुर तालुक्यापर्यंत सायकलने प्रवास करीत गेला. परत वर्धा येथे अनिकेत जात असतांनी शेवती फाटयावर अनिकेत जयस्वालचे २३ आॅगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजता आगमन झाले. यावेळी शेवती गाववासीयाकडून शाल व श्रीफळ पुष्यगुच्छ देउन शेवती येथील देवानंद देवळे, शरद देवळे, गोविंद देवळे, मंगेश सावके, अमोल साबळे, गजानन ढोरे, राजेश वर्मा, माणिकराव घोडमोडे यांनी स्वागत केले. योवळी पाणी फांउडेशनचे , पवन मिश्रा श्याम सवाई यांची उपस्थिती होती.
सायकलव्दारे ‘वॉटर कप’चा प्रचार करणारा ‘अनिकेत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 7:16 PM
कारंजा लाड :पाणी फांउडेशन कडून राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यावर्षी राज्यातील ३० तालुक्यात राबविण्यात आली. स्पर्धेच्या माध्यमातून मोठया प्रमाणात जलसंधरणाची कामे झाली आहे. त्यामुळे या स्पधेर्चे स्वरूप व्यापक प्रमाणात व्हावे या हेतूने वर्धा ते पुणे जिल्हयातील इंदापुर तालुक्या पर्यंत सायकलने प्रवास करणाºया अनिकेत जयस्वालचे स्वागत ग्राम शेवती येथील वॉटर हीरोज कडून २३ आॅगस्ट रोजी शेवती फाटयावर शाल व श्रीफळ व पुष्यगुच्छ देउन करण्यात आले.
ठळक मुद्देसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा स्पधेर्चे स्वरूप व्यापक प्रमाणात व्हावे या हेतूने वर्धा ते पुणे जिल्हयातील इंदापुर तालुक्या पर्यंत सायकलने प्रवास