दरवर्षीच्या उन्हाळ्यात रिसोड शहरात ४० डिग्रीपेक्षा अधिक उन्ह तापते. अशा स्थितीत मुक्या पक्ष्यांचा पाण्यावाचून जीव कासावीस होतो. ही बाब लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी शहरातील काही युवकांनी एकत्र येत पशुवृक्ष प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवली. या माध्यमातून आकाशअण्णा जिरवणकर, दीपक जिरवणकर, विशाल भालेराव, सोहम आसनकर, अशोक थोरात, हर्षल तायडे, सिध्देश्वर अन्नसत्रे, प्रथमेश धोतकर, सोहम पोधडे, पार्थ थोरात, वेदांत टेंभरे, साहील तायडे, गणेश तायडे, विशाल काळे, चैतन्य टेंभरे, संस्कार पोधाडे, अथर्व भोजे ही युवा मंडळी पक्ष्यांच्या दाणापाण्यासाठी परिश्रम घेत आहे. याही वर्षी शहरात विविध ठिकाणी पक्ष्यांकरिता जलपात्र बसविण्यात आले असून, पक्ष्यांचे पोट भरण्यासाठी तांदुळाचीही व्यवस्था या युवकांनी स्वखर्चातून केली आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे शहर परिसरात सर्वत्र काैतुक होत आहे.
...........................
कोट :
कडक उन्हाळ्यात पक्ष्यांचा जीव पाण्यावाचून कासावीस होतो. त्यामुळे पशुवृक्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून पक्ष्यांकरिता पाणी व तांदुळाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनीदेखील आपापल्या घरांवर पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी जलपात्र बसवावे. या मुक्या जिवांचे उदरभरण करण्यासाठी तांदूळ किंवा अन्नधान्य ठेवायला हवे.
- आकाशअण्णा जिरवणकर
सदस्य, पशुवृक्ष प्रतिष्ठान, रिसोड