मानोरा तालुक्यातील उमरी मंडळमधील उमरी, पोहरादेवी, वसंतनगर, गोडेगाव, गोगजाई, उमरी खुर्द, शेदोना, वाई, गोडेगाव, वडगाव, आदी भागांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मागील वर्षी पावसाच्या अनियमिततेने दुबार पेरणीचे संकट ओढवले असूनही जिवाचे रान करून काढणीला आलेल्या पिकांवर गारपिटीचा कहर आला. शासन सरसकट आर्थिक मदत देईल या आशेवर शेतकरी असताना शासनाची प्रशासकीय यंत्रणा मात्र नुकसानीचे पंचनामे करण्याव्यतिरिक्त काहीच करताना दिसून आली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठविणारे परिवर्तन शेतकरी संघटनेचे नेते मनोहर राठोड यांनी या प्रश्नावर सातत्याने निवेदन, स्मरणपत्र व आंदोलनाचे हत्यार उपसूनही कुठलीच कार्यवाही होताना दिसत नव्हती. परभणीच्या आमदार मेघना बोर्डीकर यांना याबाबत अवगत करताच त्यांनी हा मुद्दा विधानसभा सभागृहात उपस्थित करून वाशिम जिल्ह्यातील गारपीट व दुबार पेरणीचे संकट कोसळलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची गरज असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचा लाभ मिळणार आहे, असे शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी सांगितले.
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:27 AM