लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी यामध्ये ११ जणांची भर पडली. आता एकूण रुग्णसंख्या ३५१ वर पोहचली असून, यापैकी २०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, १८ जुलै रोजी सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.परजिल्हा, परराज्यातून जिल्ह्यात परतणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जून महिन्याप्रमाणेच जिल्ह्यात जुलै महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. त्यात आणखी दोन जणांची भर पडली. वाशिम तालुक्यातील इलखी येथील एक व मंगरूळपीर शहरातील हाजीपुरा परिसरातील एक, वाशिम येथील विनायक नगर परिसर एक, अडगाव येथे एक, इलखी ता. वाशिम येथे दोन, मंगरूळपीर येथील पठाणपुरा परिसर व गवळीपुरा परिसर प्रत्येकी एक, कारंजा तालुक्यातील शिवनगर येथील एक व मालेगाव शहरातील गांधीनगर परिसरातील एक व्यक्तीचा समावेश आहे.दरम्यान, जिल्ह्यातील सहा जणांनी १८ जुलै रोजी कोरोनावर मात केल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील दोन, मंगरूळपीर तालुक्यातील दोन, वाशिम व रिसोड तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. आता जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५१ झाली आहे.