वाशिम : जिल्ह्यात आणखी १२५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २१ फेब्रुवारी रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ७,७७३ वर पोहोचली आहे. दरम्यान, नऊ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. रविवारी आणखी १२५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, अकोला नाका परिसरातील १, महेशनगर येथील ४, इंगोले ले-आऊट परिसरातील ५, लाखाळा येथील २, शासकीय निवासस्थान परिसरातील १, जुनी आययुडीपी परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, काळे फाईल परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, उकळीपेन येथील १, मालेगाव शहरातील १, अमानी येथील १, किन्हीराजा येथील १, जऊळका येथील २, मेडशी येथील २, कुरळा येथील २, मंगरूळपीर शहरातील अशोकनगर येथील १, राजस्थान चौक परिसरातील ४, शहरातील इतर ठिकाणचा १, धरमवाडी येथील १, दाभा येथील ३, लोहगाव येथील १, कुंभी येथील १, चिंचखेडा येथील १, शहापूर येथील २, स्वासीन येथील १, नवीन सोनखास येथील १, मानोली येथील १, रिसोड शहरातील ४, कोयाळी येथील १, केनवड येथील ३, कवठा येथील ९, मसला येथील १, मांगुळ येथील १४, गोवर्धन येथील ३, मोप येथील ३, पेडगाव येथील १, देगाव येथील २, करेगाव येथील १, कारंजा शहरातील गुरु मंदिर परिसरातील ३, भारतीपुरा येथील १, विद्याभारती कॉलनी परिसरातील १, काझी प्लॉट परिसरातील १, तेजस कॉलनी परिसरातील १, गुरु मंदिर रोड परिसरातील १, गवळीपुरा येथील १, नगरपरिषद जवळील २, सहारा कॉलनी परिसरातील २, पिंपळगाव गुंजाटे येथील १, धनज येथील ५, नागलवाडी येथील ५, निमसवाडा येथील १, पारवा येथील २, शिवनगर येथील १, येवता बंडी येथील १, धामणी येथील २, मेहा येथील २ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १ कोरोनाबाधिताची नोंद झाली आहे. तसेच नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता कोरोनाबाधितांचा आकडा ७,७७३ वर पोहोचला आहे.
००
५०२ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,७७३ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी तब्बल ७,११४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५६ जणांचा मृत्यू झाला असून सद्य:स्थितीत ५०२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
००
कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाने दिल्या आहेत. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे यासह कोरोनाविषयक लक्षणे असणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. वेळीच उपचार मिळाल्यास कोरोना रुग्ण पूर्णपणे बरा हाेत असून, कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.