गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी १२६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील १६, वारा जहांगीर १, तामसी १, ब्रह्मा येथील २, भटउमरा येथील १, शेलू येथील २, रिसोड शहरातील १०, एकलासपूर येथील १, गणेशपूर येथील १, वाकद येथील १, घोटा येथील १, मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील १, भौरद येथील १, मानोरा शहरातील २, नाईक नगर येथील २, साखरडोह येथील १, गळमगाव येथील १, हिवरा बु. येथील १, असोला खु. येथील २, वाटोद येथील १, मंगरुळपीर शहरातील ९, तपोवन येथील १, पेडगाव येथील ४, शेंदूरजना येथील १, वनोजा येथील २, मोहरी येथील ४, सावरगाव येथील २, शहापूर येथील ४, मसोला येथील १, कारंजा शहरातील ३१, खडी धामणी येथील १, पोहा येथील १, वाढवी येथील २, बेलमंडल येथील १, उंबर्डा येथील १, शहा येथील ३, हिवरा लाहे येथील ५, आखतवाडा येथील १, पिंपरी मोडक येथील १, चवसाळा येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील १ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच ४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता कोरोनाबाधितांचा आकडा ८,७४७ वर पोहोचला आहे. आतापर्यंत १५७ जणांचा मृत्यू झाला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
०००
१२७६ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,७४७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ७,३१३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५७ जणांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत १२७६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.