लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी १३६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९,०७० वर पोहोचली आहे. गत १५ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवारी आणखी १३६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील तिरुपती सिटी येथील २, लाखाळा येथील २, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, बसस्थानक जवळील १, आययुडीपी कॉलनी येथील १, पोलीस स्टेशनजवळील १, जुनी आययुडीपी कॉलनी येथील ५, सिव्हील लाईन्स येथील ३, शुक्रवार पेठ येथील ३, काटीवेस येथील १, क्रांती चौक येथील १, काटा रोड येथील १, तोंडगाव येथील २, केकतउमरा येथील १, पिंपळगाव येथील १, गोंडेगाव येथील १, लोहगाव येथील १, काजळंबा येथील १, दगड उमरा येथील १, फाळेगाव थेट येथील १, रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील २, कासार गल्ली येथील १, समर्थनगर येथील ५, शहरातील इतर ठिकाणचे ५, मोप येथील ३, कवठा येथील १, मंगरूळपीर शहरातील १४, आमगव्हाण येथील ३, पोटी येथील ६, पिंप्री अवगण येथील ३, लाही येथील ३, पिंपळगाव येथील १, वसंतवाडी येथील १, पेडगाव येथील १, हिरंगी येथील १, दस्तापूर येथील १, कोंडोली येथील १, शहापूर येथील १, लाठी येथील ४, नवीन सोनखास येथील १, पार्डी ताड येथील १, मसोला येथील १, हिसई येथील ३, मानोरा शहरातील १, विळेगाव येथील १, गुंडी येथील १, उमरी येथील १, पोहरादेवी येथील ५, वाईगौळ येथील २, कुपटा येथील १, गिर्डा येथील १, नयणी येथील १, मालेगाव शहरातील ९, डोंगरकिन्ही येथील ११, शिरपूर येथील १, शेलगाव येथील २, डही येथील १, कारंजा शहरातील २ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील २ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच ९७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ९,०७० वर पोहोचला असून, यापैकी आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला आहे.
वाशिम जिल्ह्यात आणखी १३६ कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 11:26 AM