लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी १३८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ८ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १०,३५८ वर पोहोचली आहे. सोमवारी ३१३ जणांनी काेरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवारी आणखी १३८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील २९, काटा येथील १, मोहजा येथील १, अनसिंग येथील १, ब्रह्मा येथील १, आडगाव येथील २, कळंबा महाली येथील १, श्रीगिरी येथील ३, मालेगाव शहरातील २, दापुरी येथील १, मानोरा शहरातील नाईक नगर येथील २, चिखली येथील १, वाईगौळ येथील १, पोहरादेवी येथील १, उमरी खु. येथील २, रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, एकतानगर येथील २, शिवाजीनगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, मोप येथील १, बिबखेडा येथील १, मंगरूळपीर शहरातील पंचशीलनगर येथील २, मानोरा चौक येथील २, मंगलधाम येथील १, पिंपळखुटा येथील १, मोहरी येथील १, बेलखेड येथील १, कुंभी येथील १४, हिसई येथील १, आरक येथील १, कासोळा येथील १, माळशेलू येथील १, शेलूबाजार येथील १, लाठी येथील २, कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील १, संतोषी माता कॉलनी येथील ३, नूतन कॉलनी येथील २, कान्नव जीन परिसरातील १, प्रियदर्शनी कॉलनी येथील १, बस डेपो परिसरातील १, शिक्षक कॉलनी येथील १, तुषार कॉलनी येथील १, कामरगाव येथील १५, दिघी येथील १, उंबर्डा येथील २, जांब येथील १, वाल्हई येथील १, सुकळी येथील २, खेर्डा जिरापुरे येथील ५, भामदेवी येथील ३, काजळेश्वर येथील २, पिंप्री मोखड येथील १, किन्ही रोकडे येथील २, इंझा येथील ३, बांबर्डा १ तसेच पसरणी येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील एका बाधिताची नोंद झाली असून, ३१३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यात आणखी १३८ कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 11:19 AM