लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असला, तरी धोका अजून टळलेला नाही. मंगळवारी दिवसभरात ३२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५४३४ वर पोहचली आहे. दरम्यान मंगळवारी एकूण ६६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.जिल्ह्यात कोराेनाचा आलेख काही अंशी घसरत आहे. मंगळवारी एकूण ३२ जण पाॅझिटिव्ह आले. यामध्ये वाशिम शहरातील रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, इतर ठिकाणची १, काटा येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. तेरा येथील १, सहारा पार्क परिसरातील १, जऊळका येथील १, मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथील १, चौसाळा येथील १, रिसोड शहरतील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील ४, रिठद येथील ३, गोवर्धन येथील १, व्याड येथील १, हराळ येथील २, लोणी येथील ४, हिवरा पेन येथील १, गौंधाळा येथील ३, नागझरी येथील २, कारंजा लाड शहरातील गांधी नगर येथील १, शहा येथील १ अशा ३२ जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५४३४ वर पोहचली आहे. यापैकी ४६७४ जण बरे झाले.
६६ जणांना डिस्चार्ज जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हाॅस्पिटल अशा ठिकाणी उपचार घेत असलेल्या ६६ जणांनी कोरोनावर मंगळवारी मात केली. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत एकूण ४६७४ जण कोरोनातून बरे झाले आहेत.
६४२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५,४३४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४,६७४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १७७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६४२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.