डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आला. फेब्रुवारी महिन्यात गत चार, पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. गुरूवारी आणखी ४१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील महेश नगर येथील १, गुरुवार बाजार येथील १, शुक्रवार पेठ येथील १, काळे फाईल येथील १, पाटणी चौक येथील १, शिवाजीनगर येथील २, सुंदरवाटिका येथील ४, वांगी येथील १, तोंडगाव येथील ३, पार्डी येथील १, मंगरूळपीर शहरातील सुभाष चौक येथील २, सोनखास येथील १, कवठळ येथील १, चांभई येथील १, धोत्रा येथील १, कासोळा येथील १, रिसोड शहरातील २, कवठा येथील १, गोवर्धन येथील १, करडा येथील १, केनवड येथील १, नंधाना येथील १, कारंजा शहरातील जुना नगरपरिषद दवाखाना जवळील १, धनज येथील ६, मेहा येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच जिल्ह्याबाहेर आणखी तीन बाधितांची नोंद झाली असून पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आता कोरोनाबाधितांचा आकडा ७,४५७ वर पोहचला असून, यापैकी १५६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ७,०८६ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
२१४ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ७,४५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ७,०८६ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल, गृह विलगीकरण येथे २१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.