डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आला. फेब्रुवारी महिन्यात गत तीन, चार दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. बुधवारी आणखी ४३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील रमाबाई नगर येथील १, आययूडीपी कॉलनी येथील २, सिव्हील लाइन्स येथील १, पाटणी ले-आउट येथील २, गुरुकृपा हॉस्पिटल परिसरातील १, गणेशपेठ येथील १, शुक्रवार पेठ येथील १, सुंदरवाटिका येथील २, इतर ठिकाणचा १, कार्ली येथील १, मोहगव्हाण येथील १, मालेगाव शहरातील १, शिरपूर येथील १, रिसोड शहरातील १, मोप येथील ४, लोणी येथील १, मंगरूळपीर शहरातील १, शहापूर येथील ३, मोहरी येथील १, कारंजा शहरातील २, धनज येथील ११, मानोरा तालुक्यातील साखरडोह येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच जिल्ह्याबाहेर दोन कोरोनाबाधितांची नोंद झाली.
आता कोरोनाबाधितांचा आकडा ७,४१६ वर पोहचला असून, यापैकी १५६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ७०८१ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
०००००
१७८ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ७,४१६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ७,०८१ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.