वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ५४२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १४ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २०,२२१ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. बुधवारी प्राप्त अहवालानुसार आणखी ५४२ जणांना कोरोना संसर्ग झाला. यामध्ये वाशिम शहरातील मंत्री पार्क येथील ३, कोविड रुग्णालय परिसरातील ९, नवजीवन क्रिटिकल केअर परिसरातील ५, पोलीस वसाहत ४, लाखाळा ९, टिळक चौक येथील १, सिव्हील लाईन्स येथील ९, ड्रीमलँड सिटी येथील २, प्रशासकीय इमारत परिसरातील १, विठ्ठलवाडी येथील १, अल्लाडा प्लॉट येथील ३, आययूडीपी कॉलनी ६, सामान्य रुग्णालय परिसर १, दंडे चौक येथील १, दत्तनगर येथील १, निमजगा येथील १, गव्हाणकर नगर येथील १, राधाकृष्ण नगर येथील १, श्रावस्ती नगर येथील १, आंदनवाडी येथील २, शिवप्रताप चौक येथील १, इंगोले ले-आऊट येथील १, स्त्री रुग्णालय परिसरातील २, नंदीपेठ येथील २, पुसद नाका परिसरातील ३, सुंदरवाटिका येथील २, सिंधी कॉलनी येथील १, बाहेती हॉस्पिटल परिसर ५, लाईफ लाईन हॉस्पिटल परिसरातील ६, जैन भवन परिसरातील १, वाशिम क्रिटिकल केअर परिसरातील १, जवाहर कॉलनी येथील १, शुक्रवार पेठ १, ठाकरे हॉस्पिटल परिसरातील २, सौदागरपुरा परिसर १, शहरातील इतर ठिकाणचे ९, तोंडगाव येथील ८, टो येथील १, चिखली येथील ४, सापळी येथील १, जांभरुण परांडे येथील १, काटा येथील ७, ब्राह्मणवाडा येथील १, कळंबा महाली येथील १, शिरपुटी येथील १, देपूळ येथील २, सोनखास येथील १, सुरकुंडी येथील १, सावंगा जहांगीर येथील १, किनखेडा येथील २१, कार्ली येथील १, सुराळा येथील १, झाकलवाडी येथील १, सावळी येथील ४, चिखली सुर्वे येथील १२, पार्डी टकमोर येथील १, मानोरा तालुक्यातील शेंदूरजना येथील २, वाईगौळ येथील १, रिसोड शहरातील ४६, वाकद १, रिठद येथील ४, पळसखेड येथील १, गोवर्धना येथील २१०, मिर्झापूर येथील १, केनवड येथील ८, व्याड येथील १, मोठेगाव येथील १, जोगेश्वरी येथील १, कोयाळी बु. येथील ११, लोणी येथील २, जवळा येथील ६, भोकरखेडा येथील १, लिंगा येथील १, गणेशपूर येथील १, किनखेडा येथील ३, कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील १, अशोक नगर येथील १, आदर्श नगर येथील ३, कोळी येथील १, धनज येथील १, मनभा येथील २, पोहा येथील १, काजळेश्वर येथील १, मालेगाव शहरातील जैन मंदिर परिसरातील १, वाॅर्ड क्र. ८ येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १०, रेगाव येथील १, मेडशी येथील ४, डही येथील १, मुंगळा येथील २, ब्राह्मणवाडा येथील २, किन्हीराजा येथील १, गिव्हा कुटे येथील १, वरदरी येथील १, पिंपळा येथील २, झोडगा येथील १, पांगरी नवघरे येथील १, डव्हा येथील १, शिरपूर येथील ४, मंगरुळपीर शहरातील अशोक नगर येथील १, बसस्थानक परिसरातील १, अकोला चौक येथील १, वाल्मीकी नगर येथील १, शिंदे कॉलनी येथील २, मंगलधाम येथील १, बायपास परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, नवीन सोनखास येथील १, कवठळ येथील १, चांभई येथील १, बोरवा येथील २, कंझरा येथील १, शेलूबाजार येथील १, नागी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून १६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
०००००
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह २०,२२१
ॲक्टिव्ह २,८६६
डिस्चार्ज १७,१४३
मृत्यू २११