लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवार २८ आॅगस्ट रोजी दिवसभरात एकूण ५७ रुग्णांची यामध्ये भर पडली. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६२३ वर पोहोचली आहे. यापैकी ४११ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. दरम्यान, शुक्रवारी २१ व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातन सुटी देण्यात आली.जुन, जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २८ आॅगस्ट रोजी दिवसभरा ५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्येवाशिम शहरातील निमजगा येथील १, सिव्हील लाईन्स परिसरातील १, इनामदारपुरा येथील २, जुनी आययुडीपी येथील २, लाखाळा येथील ४, चामुंडादेवी परिसरातील ३, घुणाने हॉस्पिटल मागील परिसरातील १, देवळे हॉस्पिटल परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, पाटणी चौक येथील १, सुभाष चौक येथील ३, गुरुवार बाजार येथील १, अनसिंग येथील १, दोडकी येथील २, इलखी येथील १, वारा जहांगीर येथील १, मालेगाव तालुक्यातील सोमठाणा येथील १, शिरपूर जैन येथील १, मारसूळ येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, डव्हा येथील १, मानोरा तालुक्यातील धामणी येथील १, मंगरूळपीर नगरपरिषद परिसरातील ५, जनुना येथील १, पेडगाव येथील १, शेलूबाजार येथील १, रिसोड शहरातील गजानन टॉकीज परिसरातील ७, समर्थनगर येथील १, जिजाऊनगर येथील १, कंकरवाडी येथील १, येवती येथील १, करडा येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, राम मंदिर परिसरातील १, नागनाथ मंदिर जवळील परिसरातील १, उपविभागीय कार्यालय परिसरातील १, पोहा येथील १ व्यक्ती अशा ५७ व्यक्तींचा समावेश आहे२१ जणांना डिस्चार्जशुक्रवारी २१ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये वाशिम शहरातील बाळू चौक येथील १, देवपेठ येथील १, ईश्वरी कॉलनी परिसरातील १, अनसिंग येथील १, वारा जहांगीर येथील २, रिसोड शहरातील अयोध्या नगर येथील ६, चिचांबाभर येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेगी येथील १, कळंबा बु. येथील १, रामगड येथील १, कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील १, आखातवाडा पीएनसी कॅम्प येथील ४ व्यक्तींना समावेश आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वाशिम जिल्हयात आणखी ५७ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:50 AM