वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, १३ आॅगस्ट रोजी तब्बल ६७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १०८८ झाली असून, यापैकी ३७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिकच तेजीत असून, यामध्ये गुरूवारी ६७ जणांची भर पडली. १३ आॅगस्ट रोजी दुपारच्या अहवालानुसार, वाशिम शहरातील ड्रिमलॅण्ड सिटी परिसर तीन, काटीवेश परिसर सात, वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील एक, साखरा येथील तीन, पार्डी आसरा येथील एक, रिसोड शहरातील जिजाऊ नगर एक, देशमुख गल्ली येथील एक, एकलासपूर एक, गोहगाव दोन, मालेगाव तालुक्यातील शिरसाळा तीन, मुठ्ठा दोन, शिरपूर ३ अशा २८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. सायंकाळच्या अहवालानुसार वाशिम शहरातील शिवप्रताप नगर १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन ७, शिरसाळा २१, मंगरूळपीर येथील पोस्ट आॅफिस रोड परिसर १, शेगी १, कारंजा लाड शहरातील भारतीपुरा १, गायत्री मंदिर परिसर ५, किन्ही रोड बायपास परिसर २ असे एकूण ३९ जण कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. दरम्यान अमरावती येथे उपचार घेत असलेल्या कारंजा शहरातील ७० वर्षीय व्यक्तीचा ६ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला असून त्याची नोंद गुरूवारी घेण्यात आली.
६९८ जणांची कोरोनावर मातआतापर्यंत जिल्ह्यात १०८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. एकिकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत ६९८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
३७० जणांवर उपचार सुरूजिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०४९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी ६७५ जणांनी कोरोनावर मात केली. आता ३५५ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.