लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी एकाचा मृत्यू, तर १६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९,२३६ वर पोहोचली आहे. गत १६ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कारंजा येथील ७३ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद मंगळवारी घेण्यात आली तर आणखी १६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील जवाहर कॉलनी येथील १, जुनी आययुडीपी कॉलनी येथील ३, अल्लाडा प्लॉट येथील २, लाखाळा येथील १, राधाकृष्ण नगर येथील ३, नालंदा नगर येथील १, पुसद नाका परिसरातील २, गणेशनगर येथील १, एसीबी ऑफिस परिसरातील १, ब्रह्मा १, झाकलवाडी येथील १, तामसी १, वरुड १, रिसोड शहरातील ३, घोटा येथील २, मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील १०, वसंतनगर येथील ५, मंगरूळपीर शहरातील १३, बोरवा १, मोहरी २, बेलखेड येथील १, सोनखास येथील ४, शहापूर येथील २, कोळंबी येथील १, लाठी येथील ३, शेलूबाजार येथील ३, वरुड येथील १, कासोळा येथील १, शेंदूरजना येथील २, वनोजा येथील १, कारंजा शहरातील ४५, पसरणी येथील ९, अनाई येथील १, रामनगर येथील २, कामठवाडा येथील १, उंबर्डा बाजार येथील ३, पोहा येथील ६, वाल्हई येथील २, यावर्डी येथील २, वडगाव रेंगे येथील १, कामरगाव येथील २, बेंबळा फाटा येथील १, मोऱ्हाळ येथील २, वढवी येथील १, महागाव येथील १, धनज येथील १, हिंगणवाडी येथील २, खेर्डा जिरापुरे येथील ५, सुकळी येथील १, दिघी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. २३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ९,२३६ वर पोहोचला असून, यापैकी आतापर्यंत १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ७,६८५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
वाशिम जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; १६६ कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 11:07 AM