००००
केनवड परिसरात बियाण्याची टंचाई
वाशिम : केनवड परिसरात महाबीजचे सोयाबीन बियाण्यांची टंचाई निर्माण झाली आहे. महाबीजचे सोयाबीन बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. इतर कंपन्यांचे सोयाबीन बियाणे महाग असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
०००००
कवठळ येथे नागरिकांची आरोग्य तपासणी
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथे आणखी तीन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. कोरोनाविषयक लक्षणे असल्यास चाचणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.
०००००
शेती मशागतीची कामे पूर्णत्वाकडे (फोटो)
वाशिम : खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेती मशागतीची कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. मृग नक्षत्रात दोन, तीन वेळा दमदार पाऊस झाल्यास शेतकरी पेरणी करण्याच्या अंदाजात असल्याचे दिसून येते. यंदाही जिल्ह्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
०००