आणखी एक रुग्ण वाढला; दिल्लीहून आलेली महिला कोरोना पॉझिटीव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 12:35 PM
दिल्ली येथून आलेली महिला कोरोना पॉझिटीव्ह निघाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नवी मुंबई येथून मानोरा तालुक्यातील भोयणी येथे परतलेल्या एका ६० वर्षीय महिलेचा तसेच मध्यप्रदेशातून परतलेल्या युवतीचा कोरोना चाचणी अहवाल ३ जून रोजी पॉझिटिव्ह आला, तर नवी दिल्ली येथून कारंजा तालुक्यातील दादगाव येथे परतलेल्या महिलेचाही कोरोना चाचणी अहवाल ४ जून रोजी पॉझिटिव्ह आला. यामुळे आरोग्य यंत्रणा सर्तक झाली असून, पहिल्या दोन रुग्णाच्या हाय-रिस्क संपर्कातील प्रत्येकी पाच अशा दहा जणांची रवानगी आयसोलेशन कक्षात करण्यात आल्यानंतर दिल्लीतून परतलेल्या रूग्णाच्या संपर्कात नेमके किती जण आले, याची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. जिल्ह्यात मेडशी येथील एका व्यक्तीने कोरोनावर मात केल्यानंतर एका ट्रकच्या क्लीनरचा कोरोना संसर्गाने जिल्ह्यात मृत्यू झाला, तर त्याच्या संपर्कात आलेल्या ड्रायव्हरनेही कोरोनावर मात केली. त्यानंतर १९ मेपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. दरम्यान वाशी (नवी मुंबई) येथून मानोरा तालुक्यातील भोयणी येथे २८ मे च्या दरम्यान परतलेल्या एका ६० वर्षीय महिेलेला सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असल्याने मानोरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात दाखल करून १ जून रोजी तिचा थ्र्रोट स्वॅब नमुना तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आला होता. त्याशिवाय मध्यप्रदेशातून परतलेल्या युवतीचा कोरोना चाचणी अहवालही ३ जून रोजी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती आरोग्य विभाग आणि प्रशासनाने घेणे सुरु केले असतानाच नवदी दिल्ली येथून कारंजा तालुक्यातील दादगाव येथे परत आलेल्या एका महिलेचा अहवालही ४ जून रोजी पॉझिटीव्ह आला. सदर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेसह मानोरा तालुका प्रशासन अलर्ट झाले. आता या तिन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली असून, कोरोनाबाधित रुग्णाचे गावात १४ दिवसांसाठी आरोग्य कर्मचाºयांमार्फत सर्वे केला जाणार आहे. त्या गावचा एरिया सील केला जाणार असून, ज्या ठिकाणी संबंधित रुग्ण वावरला, त्या ठिकाणी हायड्रोक्लोराईड सोल्यूशनची फवारणी केली जाणार आहे.