जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. बुधवारी सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील नवीन आययूडीपी कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मंगरूळपीर तालुक्यातील चिंचखेडा येथील १, रिसोड शहरातील रामनगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, वनोजा येथील १, आसेगाव पेन येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,९३२ वर पोहोचला आहे.
००
१४६ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ६,९३२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,६३३ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.