राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने राष्ट्रवादी संवाद कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेणार असून, जिल्ह्यातील विधानसभानिहाय मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. ६ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर सकाळी ९.४५ वाजता वाशिम येथून रिसोडकडे प्रयान करतील. सकाळी १०.४५ ते ११.३० वाजता रिसोड येथे पुष्पाताई पाटील विद्यालय येथे विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. सकाळी ११.३० वाजता रिसोड येथून वाशिमकडे प्रयाण करतील व दुपारी १२.३० वाजता वाशिम येथे आगमन होईल. दुपारी १२.३०. ते १.१५ वाजताचा वेळ राखीव असेल. त्यानंतर दुपारी १.१५ ते २.०० वाजता वाशिम जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहतील. लगेच दुपारी २ ते २.४५ वाजता जैन भवन येथे विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत, तसेच दुपारी २.४५ ते ३.०० वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी ३.०० ते ३.३० वाजता जैन भवन यथे पत्रकार परिषदेला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता वाशिम येथून कारंजाकडे प्रयाण करणार आहेत. सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजता कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व विभाग प्रमुख, पदाधिकारी तसेच सर्व सेलच्या प्रमुखांनी आपआपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणीच उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले आहे.
संवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:17 AM