............
कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागाने आरटीपीसीआर, अॅन्टीजन चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. यासह व्यापाऱ्यांनीही कोरोना चाचणी करून घेतली असून जे अद्याप यापासून दूर आहेत, त्यांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी केले.
...............
पुसद नाक्यावरील वाहतूक ठप्प
वाशिम : शहरातील पुसद नाक्यावर रविवारी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास बराचवेळ वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वेगेट बंद असल्याने हा प्रकार उद्भवला होता. यामुळे वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
................
नियम तोडणाऱ्यांवर होणार कारवाई
वाशिम : रंगपंचमीचा सण शांततेत व साधेपणाने साजरा करा, असे प्रशासनाचे सक्त निर्देश आहेत. त्यानुषंगाने २९ मार्च रोजी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार असून नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती ठाणेदार धृवास बावनकर यांनी दिली.
................
पाणीपुरवठा योजनांचे देयक अदा करा
वाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा योजनांचे कोट्यवधी रुपयांचे विद्युत देयक थकीत आहे. यामुळे महावितरण आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून ग्रामपंचायतींनी देयक अदा करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी केले.