००००
मोफत रेती देण्याची मागणी
वाशिम : घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास मोफत रेती देण्याचा शासन निर्णय होऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. जिल्ह्यातील एकाही लाभार्थीला अद्याप मोफत रेती मिळाली नाही. मोफत रेती देण्याची मागणी लाभार्थींनी बुधवारी केली.
०००
कृषी सेवा केंद्रांची तपासणी
वाशिम : निर्धारित किमतीपेक्षा अधिक दराने खत, बियाण्यांची विक्री होत आहे का? आवश्यक ते दस्तावेज कृषी विक्रेत्यांकडे आहेत का? यासंदर्भात कृषी विभागाच्या पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली जात आहे.
००००
आधार नोंदणी पूर्ववत केव्हा होणार?
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आधार नोंदणी केंद्र बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे बालकांची आधार नोंदणी प्रभावित झाली होती. आता अनलॉक असल्याने आधार नोंदणी पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे.
000000000000
निधीअभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत
वाशिम : मोकाट जनावरे पिकांचे नुकसान करतात, तसेच रस्त्यावर बसत असल्याने वाहतूकही प्रभावित होते. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक नगर परिषद तसेच ग्रामपंचायत अंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत; मात्र या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. दुरुस्तीसाठी निधीची गरज आहे.