वाशिम : मुख्यमंत्री विशेष सहाय्यता निधीसाठी निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील भामदेवी या गावात लोकसहभागातून अत्यंत चांगले काम झाले आहे. दुधाळ जनावरांची वाढलेली संख्या आणि दुध प्रक्रिया केंद्राच्या उभारणीमुळे गावातील दुग्धव्यवसायाला चालना मिळाली. हा व्यवसाय अजून वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी लागणारे सहकार्य करण्यास आपण तयार आहोत, अशी ग्वाही अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिली.आयुक्तांनी भामदेवीला शुक्रवारी भेट देऊन तेथील दुग्धोत्पादकांशी विविध विषयांवर चर्चा केली. अधिक उत्पादन मिळावे, याकरिता ‘मिल्क क्लस्टर’ विकसीत करण्याचे आवाहन करून पियूष सिंह पुढे म्हणाले, की इतर जिल्ह्यांमध्ये ‘मदर डेअरी’च्या माध्यमातून दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर वाशिम जिल्ह्यात दूध संकलनासाठी वऱ्हाड दूध उत्पादक संस्थेने प्रयत्न करावे. त्यासाठी ‘मिल्क क्लस्टर’ विकसित करावे. कृषि समृद्धी व इतर योजनांमधून वºहाड दूध उत्पादक संस्थेला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमास आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषि समृद्धी प्रकल्पाचे व्यवस्थापक शर्मा, तहसीलदार सचिन पाटील, सरपंच सुभाष मोहकार, उपसरपंच देवचंद कांबळे, डॉ. निलेश हेडा यांच्यासह दूध उत्पादक संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
‘वऱ्हाड दूध’साठी सर्वतोपरी सहकार्य करणार, 'मिल्क क्लस्टर' विकसीत करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 2:52 PM