जिल्ह्यातील वाहतूक शाखा तसेच विविध पाेलीस ठाण्यांमार्फत नियमभंग करणाऱ्या जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील वाहनांवर माेटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत दंड करण्यात आला आहे. अनेक वाहनचालकांकडून दंडाची रक्कम अद्याप भरणे बाकी आहे. याकरिता विशेष संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, नमूद दिनांकास वाहनधारकांनी त्यांचे नजिकचे पाेलीस स्टेशन वाहतूक शाखा किंवा काेणताही वाहतूक अंमलदार यांचेकडे जाऊन अथवा ऑनलाइन पद्धतीने भरणा करावा. दंड न भरल्यास वाहन जप्त करण्यात येईल, तसेच सदर दिवशी थकीत दंड न भरल्यास २५ सप्टेंबर राेजी जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात थकीत दंडाच्या रकमेचा भरणा करून घेणेकरिता लाेकअदालत आयाेजित करण्यात येणार आहे. या दिवशी न्यायालयात जाऊन दंड भरुन शासनास सहकार्य करण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नागेश माेहाेड यांनी केले आहे.
.....
जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात २५ सप्टेंबर राेजी लाेकअदालत आयाेजित आहे. याचा फायदा वाहनचालकांनी घ्यावा.
- नागेश माेहाेड
शहर वाहतूक शाखा निरीक्षक, वाशिम.