.................
शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेक
वाशिम : शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास वर्षभरातील ३६५ दिवस जलाभिषेक करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार, २५ मार्च रोजी सकाळी अतूल वाटाणे यांच्याहस्ते जलाभिषेक करण्यात आला. यावेळी अजय तोडकर, शुभम शेळके, स्वप्निल विटोकार उपस्थित होते.
..................
कोरोनावर नियंत्रणासाठी युद्धस्तरावर प्रयत्न
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर नियंत्रण मिळवून परिस्थिती पुर्वपदावर आणण्याकरिता आरोग्य विभाग युद्धस्तरावर प्रयत्न करित आहे. संपूर्ण यंत्रणा याकामी झटत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी दिली.
................
अवैध रेती वाहतुकीवर करडी नजर
वाशिम : परजिल्ह्यातून वाशिम शहर परिसरात होत अवैधरित्या होत असलेल्या रेती वाहतुकीवर महसूल विभाग करडी नजर ठेवून आहे. कारवाईत कोणाचीही हयगय केली जाणार नाही, असा इशारा तहसीलदार विजय साळवे यांनी दिला.
...............
दुकाने बंद, वाहतूक जोमात
वाशिम : सायंकाळी पाच वाजेनंतर प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून दुकाने बंद केली जात आहेत; मात्र त्यानंतरही बराचवेळ शहरातून वाहतूक जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे.