विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज भरून पुरवठा विभागात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवार ते शनिवार अनुक्रमे मानोरा, उमरी, शेंदूरजना, इंझोरी, कुपटा व गिरोली अशा महसूल मंडलासाठी दिवस ठरवून दिले आहेत. नागरिकांनी नेमलेल्या दिवशी आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे. आपले नाव समाविष्ट करण्यासाठी मूळ रेशन कार्डमधून नाव कमी, स्वयंघोषणा पत्र, विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड, तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, मयत व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी मूळ रेशनकार्ड, ग्रामपंचायत, नगरपंचायतचे मृत्यू प्रमाणपत्र, विहित नमुन्यातील अर्ज ,आधार कार्डची छायांकित प्रत सादर करून या याेजनेचा लाभ घेता येऊ शकताे, अशी माहिती तहसीलदार शारदा जाधव यांनी दिली आहे.
------------
आपले न्यायहक्क मिळविण्यसासाठी ही याेजना सुरू करण्यात आली आहे. लाभार्थींनी या याेजनेचा लाभ घ्यावा. आवश्यक कागदपत्रे निर्धारित वेळेत जमा करावीत.
शारदा जाधव, तहसीलदार, मानाेरा